महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आता घरातच होणार गॅसची ई-केवायसी

11:43 AM Jan 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गॅस वितरकांवर जबाबदारी; ग्राहकांना दिलासा

Advertisement

बेळगाव : गॅसच्या ई-केवायसीची जबाबदारी संबंधित वितरकांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गॅस वितरणावेळी घरोघरी ई-केवायसी केली जाणार आहे. त्यामुळे गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने गॅस ई-केवायसीचा आदेश बजावला आहे. त्यामुळे गॅस एजन्सींसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र ई-केवायसीची जबाबदारी वितरकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची  ई-केवायसीची धडपड थांबणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शनचे बायोमेट्रीक म्हणजेच ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने ई-केवायसीसाठी एजन्सी कार्यालयांसमोर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. यासाठी आता ई-केवायसीचे काम घरोघरी फिरून गॅस वितरण करणाऱ्या वितरकांकडे सोपविण्यात आले आहे. गॅसच्या वितरणावेळीच संबंधित ग्राहकांची ई-केवायसी केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एजन्सी कार्यालयांकडे गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. मागील 20 दिवसांपासून ग्राहकांची ई-केवायसीसाठी धडपड सुरू आहे. गॅस वितरण करणाऱ्या कार्यालयांसमोर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास होऊ लागला आहे. मात्र आता ग्राहकांची ई-केवायसी करण्याची जबाबदारी वितरकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गॅस वितरणाबरोबरच ई-केवायसीचे काम पूर्ण होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article