For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता सुनीता केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता सुनीता केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार
Advertisement

न्यायालयीन कार्यवाही व्हायरल केल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या वादाच्या भोवऱ्यात आल्या आहेत. दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या मुख्यमंत्र्यांची न्यायालयीन कार्यवाहीसंबंधी माहिती सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल एका वकिलाने सुनीता केजरीवाल यांच्यासह इतरांविऊद्ध तक्रार दाखल केली आहे. न्यायालयातील सुनावणी सुनीता केजरीवाल आणि इतर राजकीय नेत्यांनी रेकॉर्ड करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्याचा दावा एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारदार वकिलाने 28 मार्च रोजी विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयीन कामकाज दाखवणारा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. या प्रकरणात तक्रारदाराने सुनीता केजरीवाल, इतर आरोपी आणि राजकीय पक्षांवर न्यायालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नियमांचे जाणूनबुजून उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. हे आरोप केलेल्यांमध्ये सुनीता केजरीवाल, अक्षय, प्रोमिला गुप्ता (काउंसिलर, प्रभाग 11, तिमारपूर), विनीता जैन (काँग्रेस राजस्थान उपाध्यक्ष) आणि अऊणेश कुमार यादव यांची नावे आहेत. तक्रारीत वकिलाने आम आदमी पक्षाच्या सदस्यांवर ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे ‘न्यायालयाच्या कामकाजाची बदनामी आणि फेरफार’ करण्याचा प्रयत्न करण्यासाठी जाणूनबुजून पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.