For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेवा रुग्णालयात आता कॅथलॅब सुविधा

11:52 AM Mar 23, 2025 IST | Radhika Patil
सेवा रुग्णालयात आता कॅथलॅब सुविधा
Advertisement

कोल्हापूर / दीपक जाधव : 

Advertisement

ह्रदयविकाराच्या वाढत्या रुग्णाचा विचार करता आरोग्यविभागाने सेवा रुग्णालय येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत कॅथलॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा ह्रदयविकार असणाऱ्या रुग्णांना होणार आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सेवा रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी सेवा देण्यावर भर दिला आहे. एमआरआय, सिटी स्कॅन नंतर आता त्यांनी कॅथलॅब सुरु करण्याला मान्यता दिली आहे. रुग्णाला योग्य व वेळेवर उपचार देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असणार आहे. ही कॅथलॅब सुरु झाल्यास ह्रदयविकाराच्या रुग्णाला गोल्डन अवरमध्ये येथे उपचार घेता येणार आहेत. सध्या संपूर्ण देशभरात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. विशेष करुन तरुणांमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली, झोप पूर्ण न होणे, खाणं-पिणं वेळेवर नसणे, पौष्टिक आहार न घेणे. सध्या लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. जास्तीत जास्त जंक फूड खाणं. त्याचबरोबर जास्त व्यायाम करण्यामुळेही हृदयविकाराचा धोका जाणवतो.

Advertisement

  • कॅथलॅबची वैशिष्ट्या

हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीने उपचार
हृदयाच्या झडपांचे खराब व्हॉल्व्ह, पेसमेकर बसविणे सोपे
शस्त्रक्रियेविनाही उपचार करणे शक्य

  • कॅथलॅब म्हणजे काय

रुग्णांच्या हृदयाची तपासणी व उपचार करण्यासाठी स्वतंत्र कॅथलॅबचा वापर केला जातो. प्रयोगशाळेत असलेल्या मशिन्सद्वारे मॉनिटरवर हृदय पाहून हा आजार सहजपणे ओळखला जातो.

  • सीपीआर रुग्णालयावरील ताण कमी होईल

सेवा रुग्णालय फक्त बाळंतपणासाठी न राहता तिथे येणाऱ्या रुग्णाला चांगले उपचार कसे मिळतील या दृष्टिकोनातून एमआरआय, सिटी स्कॅन, कॅथलॅबसारखे अनेक विभाग चालू करण्यात येणार आहे. यामुळे सीपीआर रुग्णालयावरील ताण ही कमी होईल. रुग्णाला जसे मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलमधे उपचार सुविधा मिळतात, तशा सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
                                           -
प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

Advertisement
Tags :

.