आता महिलेच्याही हाती ‘लालपरी’चे स्टेअरिंग
कोल्हापूर :
आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. अगदी दुचाकी पासून ते विमान चलविण्यापर्यंत महिलांनी आघाडी घेतली आहे. त्याच अनुषंघाने राज्य परिवहनच्या कोल्हापूर विभागातील मलाकपूर आगारात एसटी चालकपदी एका महिलेची निवड झाली आहे. त्युमळे ‘लालपरी’चे स्टेरींगही आता महिलेच्या हाती आले आहे.
सरोज महिपती हांडे (रा. सुपात्रे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. कोल्हापूर विभागात पहिली एसटी महिला चालक होण्याचा त्यांनी बहुमान मिळवला आहे. शनिवार दि.18 रोजी त्यांना मलकापूर आगाराच्या विभाग नियंत्रकांनी निवडीचे प्रमाणपत्र प्रदान करून सेवेत रूजू होण्याच्या सुचना दिल्या. त्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केला होता.
कोल्हापूर विभागासाठी सरळसेवा भरती 2019 अंतर्गत लेखी परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या अर्हतेची छाननी मूळ प्रमाणपत्रावरुन कार्यालयामार्फत करण्यात आली. त्याचबरोबर 10 किलोमीटर प्रमाणे 390 दिवसांचे भरतीपूर्व प्रशिक्षण व प्राथमिक वाहन चालन चाचणीत उत्तीर्ण झाल्या. यानंतर 80 दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण व अंतिम वाहन चालन चाचणी पात्रता पूर्ण केली. यानंतर मलकापूर आगारामध्ये रोजंदारीवर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात आली. मलकापुर आगार कार्यालयामध्ये आगार व्यवस्थापक व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.