For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी रेल्वे स्थानकातही आता १२ तास रिझर्वेशन

10:36 AM Aug 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी रेल्वे स्थानकातही आता १२ तास रिझर्वेशन
Advertisement

खा. नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असलेले रिझर्वेशन काउंटर आता सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत बारा तास सुरू राहणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसेच स्थानिकांनी याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते त्यानंतर त्यांनी त्वरित पाठपुरावा केल्यानंतर आजपासून हा रिझर्वेशन काउंटर बारा तास उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याबाबत स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील रिझर्वेशन काउंटर पूर्वी केवळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होता. कुडाळ व अन्य स्थानकात मात्र सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत रिझर्वेशन काऊंटर सुरू होता. सावंतवाडीत ही सोय नसल्यामुळे रिझर्वेशन करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठी गैरसोय होत होती. सावंतवाडी रेल्वे स्थानकातून सावंतवाडी शहरासह सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच वेंगुर्ला रेडी शिरोडा बांदा ते दोडामार्ग पर्यंत प्रवासी प्रवास करत असतात. त्या पार्श्वभूमीवर लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी असलेले काउंटर रिझर्वेशन करण्यासाठी त्यांना केवळ सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत काउंटर सुरू होता.याबाबत स्थानिक प्रवाशांनी ९ ऑगस्ट रोजी सावंतवाडी रोड स्थानकाच्या परिसर नूतनीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाला केलेल्या सूचनेनुसार हा रिझर्वेशन काउंटर आता सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजेच बारा तास सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्याबाबत खासदार नारायण राणे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.