महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अधिवेशनाबाबत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना सूचना

10:09 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मनपा आयुक्तांनी घेतली बैठक

Advertisement

बेळगाव : हिवाळी अधिवेशन अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यामुळे त्याच्या तयारीला महापालिकेतील अधिकारी जोमाने लागले आहेत. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची याबाबत बैठक घेऊन त्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. सोमवारी स्मार्ट सिटीचे अधिकारी व कर्मचारी महापालिकेमध्ये उपस्थित होते. त्यांना अधिवेशनाच्या तयारीला लागा, असे सांगण्यात आले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे अधिवेशनाची महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व मंत्री, आमदार यांच्यासह अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय करण्याची जबाबदारी दिली आहे. याचबरोबर इतर कामेही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे दररोज आता विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते सूचना करत आहेत.

Advertisement

 पाणीपुरवठा सुरळीत करा

सोमवारी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. याचबरोबर शहरातील स्वच्छता तसेच विद्युत पुरवठ्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नका. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आयुक्तांच्या कक्षामध्येच ही बैठक घेण्यात आली. त्यानंतर स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापक संचालक सईदाबानू बळ्ळारी यांनीही स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article