महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठी अभिजातची अधिसूचना सुपूर्द

06:45 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

 मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे अधिसूचना सादर

Advertisement

नवी दिल्ली:

Advertisement

मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिकृत अधिसूचना बुधवारी पेंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली. अशी माहिती मराठी भाषा मंत्री व उद्योग मंत्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते.

मंत्री सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की, 11 वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा मी मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो. याबाबतची अधिसूचना  स्वीकारताना त्याच विभागाचा कॅबिनेटमंत्री आहे, हा मोठा योगायोग जुळून आला आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच महाराष्ट्राच्यावतीने पंतप्रधान मोदींचे  आभार मानले.

पेंद्रीय सांस्कृतिक मंत्री  शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये मंत्री सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला मंत्री शेखावत यांनी येण्याचे मान्य केले असल्याची माहिती  त्यांनी योवळी दिली.

‘दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी राज्यशासन उभे असल्याचे ही  सामंत यांनी यावेळी सांगितले. पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी ऊपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षी ही तेवढीच मदत दिली जाईल, असे मंत्री सामंत म्हणाले.

दिल्लीमध्ये मराठी शाळांसाठी प्रयत्न

दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेल, असे आश्वासन  सामंत यांनी यावेळी दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia