For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा पंचायत निवडणुकीची अधिसूचना 13 नोव्हेंबर रोजी

02:57 PM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा पंचायत निवडणुकीची अधिसूचना 13 नोव्हेंबर रोजी
Advertisement

त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता : 13 डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम

Advertisement

पणजी : राज्यातील विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी 2026 मध्ये संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी ही निवडणूक घेणे आवश्यक असल्याने गोवा राज्य निवडणूक आयोगाने तशी तयारी केली आहे. त्यामुळे 13 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर तपशीलवार कार्यक्रम होईल. या निवडणुका होण्यापूर्वी म्हणजे एक महिना आधी 13 नोव्हेंबर रोजी राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय अधिकारी दौलत हवालदार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गोवा राज्य निवडणूक आयोगावर निवृत्त प्रशासकीय अधिकारी मिनिनो डिसोझा (आएएस) यांची आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे. आयुक्त डिसोझा यांनी ताबा घेतल्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीच्या कामकाजाबाबत आढावा घेतला आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुका आता वेळेत होण्याबरोबरच पारदर्शक होण्यासाठी आयोगाने आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे.

Advertisement

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघामध्ये कोणताही बदल झालेला नाही. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 25 जिल्हा पंचायत मतदारसंघ आहेत. परंतु या दोन्ही जिल्हा मतदारसंघांत मिळून अंदाजे 5 टक्के मतदार यंदा वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 2020 सालातील दोन्ही जिह्यातील मतदारांच्या आकडेवारीनुसार, उत्तर गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघातील एकूण 25 मतदारसंघांमध्ये साधारणत: 4 लाख 18 हजार 921 इतके मतदार आहेत.

तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघात 4 लाख 11 हजार 657 इतके मतदार आहेत. उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिह्यात एकूण 8 लाख 30 हजार 578 मतदार आहेत. यामध्ये 4 लाख 25 हजार 966 महिला मतदार तर 4 लाख 4 हजार 612 मतदार हे पुऊष आहेत. तर यंदा या दोन्ही मतदारसंघांत मिळून 5 टक्के मतदार वाढले आहेत.

उत्तर गोव्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघ

हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणा, सिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, पेन्ह द फ्रांक, सांताक्रुझ, ताळगाव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स, लाटंबार्से, कारापूर-सर्वण, मये, पाळी, होंडा, केरी व नगरगाव हे मतदारसंघ उत्तर गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघात येतात.

दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघ

उसगाव गांजे, बेतकी खांडोळा, कुर्टी, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बोरी, शिरोडा, राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, दवर्ली, गिरदोळी, कुडतरी, नावेली, सावर्डे, धारबांदोडा, रिवोणा, शेल्डे, बार्से, खोला, पैंगीण, सांकवाळ, कुठ्ठाळी.

Advertisement
Tags :

.