महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शनिवारी शहरातील 320 व्यावसायिकांना मनपातर्फे नोटिसा

06:16 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शहरातील आस्थापनांना कन्नडसक्ती करण्याचे काम महापालिकेकडून सुरूच आहे. गेल्या चार दिवसांमध्ये तब्बल 2931 जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. आस्थापनांच्या नामफलकावर 60 टक्के कन्नडसक्ती करण्यात आली आहे. खुद्द महापालिका आयुक्त पी. एन. लोकेश हे रस्त्यावर उतरले आहेत. दुकानदारांना दोन दिवसांत कन्नडचा उल्लेख करावा, अन्यथा दुकाने सील करू, असे सांगण्यात येत आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

शनिवारी शहरातील विविध भागातील 320 व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिवसभर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी, तसेच इतर भागांमध्ये नोटिसा देण्यात आल्या. गेल्या चार दिवसांपासून ही कारवाई केली जात आहे. दि. 28 फेब्रुवारी रोजी तब्बल 1296 व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या. फलकांवरील जागेमध्ये 60 टक्के कन्नडचा उल्लेख केला पाहिजे. उर्वरित 40 टक्क्यांमध्ये इतर कोणत्याही भाषेचा उल्लेख केल्यास आमची हरकत राहणार नाही, असे महानगरपालिकेचे अधिकारी सांगत आहेत.

शहरामध्ये ही सक्ती केली जात असल्यामुळे व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवार दि. 29 रोजी 749, शुक्रवार दि. 1 रोजी 566 आणि शनिवारी 320 अशा एकूण आतापर्यंत शहरातील 2931 व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article