For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिशंकर अय्यर यांना घर रिक्त करण्याची नोटीस! मुलगीने केला होता राम मंदिराला विरोध

06:46 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिशंकर अय्यर यांना घर रिक्त करण्याची नोटीस  मुलगीने केला होता राम मंदिराला विरोध
Advertisement

कन्येने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला विरोध केल्याची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संपुआ सरकारमधील पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर आणि त्यांची मुलगी सुरन्या अय्यर यांना घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली आहे. मणिशंकर अय्यर यांची मुलगी सुरन्या अय्यर हिने अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठो सोहळ्याच्या निषेधार्थ 3 दिवसीय उपोषण केले होते. तसेच सनातन धर्माविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने (आरडब्ल्यूए) त्यांना दिल्लीतील जंगपुरा येथील घर रिकामे करण्याची नोटीस पाठवली आहे.

Advertisement

अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराविरोधात वक्तव्ये करणे आणि उपोषण करणे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या कन्येला महागात पडताना दिसत आहे. मणिशंकर अय्यर यांची मुलगी सुरन्या अय्यरला ती राहत असलेल्या सोसायटीतून निघून जाण्यास सांगण्यात आले आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची कन्या सुरन्या अय्यर हिने राम मंदिर उभारणीच्या निषेधार्थ आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविरोधात तीन दिवस उपोषण करतानाच सनातन धर्माविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे.

मणिशंकर यांची मुलगी सुरन्या अय्यरने 22 जानेवारी रोजी अयोध्या राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा निषेध करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टसाठी सार्वजनिक माफी मागावी किंवा घर रिकामे करावे, असे ‘आरडब्ल्यूए’च्या नोटीसमध्ये म्हटले आहे. सुरन्या अय्यर हिने 20 जानेवारी रोजी फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यात अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाच्या निषेधार्थ आपण तीन दिवस उपोषण करत असल्याचा दावा करण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.