For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुप्रिया श्रीनेत अन् दिलीप घोष यांना नोटीस

06:42 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुप्रिया श्रीनेत अन् दिलीप घोष यांना नोटीस
Advertisement

आक्षेपार्ह टिप्पणी भोवण्याची चिन्हे : निवडणूक आयोगाने घेतली दखल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत आणि भाजप नेते दिलीप घोष यांना निवडणूक आयोगाने बुधवारी नोटीस जारी केली आहे. काँग्रेस नेत्या श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकौंटवरून एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. याचबरोबर दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. याचमुळे या दोन्ही नेत्यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.

Advertisement

ममतादीदी गोव्यात पोहोचल्यावर आपण गोव्याच्या कन्या आहोत, असे म्हणतात. मग त्रिपुरात गेल्यावर त्रिपुराच्या कन्या आहोत असे सांगतात. केवळ कुणाची कन्या होणे पुरेसे नाही असे म्हणत घोष यांनी त्याला आक्षेपार्ह टिप्पणीची जोड दिली होती. त्यांच्या या टिप्पणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर तृणमूल काँग्रेसने घोष हे पूर्वीच्या मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने हताश झाल्याची टीका केली होती. निवडणूक आयोगाने आता घोष यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी येथे बॉलिवूड अभिनेत्री कंगना  रनौतला उमेदवारी दिली आहे. यासंबंधी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी इन्स्टाग्राम अकौंटवरून अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. परंतु वाद उभा ठाकल्यावर श्रीनेत यांनी ही पोस्ट हटविली होती. मी कधीच कुठल्याही महिलेबद्दल अशी टिप्पणी करू शकत नाही हे मला ओळखणारे लोक जाणतात. माझे सोशल मीडिया अकौंट अनेक जण हाताळत असून यापैकी एकाने ही पोस्ट केल्याचा दावा श्रीनेत यांनी केला होता. परंतु निवडणूक आयोगाने आता या पोस्टप्रकरणी श्रीनेत यांना नोटीस जारी केली आहे.

Advertisement
Tags :

.