आमदार अपात्रताप्रकरणी सभापती तवडकरना नोटिस
12:58 PM Feb 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांच्या अपात्रता प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सभापती रमेश तवडकर यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना बुधवारी नोटीस जारी केली आहे. पुढील सुनावणी 2 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकादार डॉमनिक नोरोन्हा यांनी सभापती रमेश तवडकर यांच्या आठ आमदारांच्या अपात्रता प्रकरणी दिलेल्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेतील सर्व प्रतिवाद्यांना नोटिसा जारी केल्या आहेत. यात सभापती रमेश तवडकर यांच्यासह आमदार दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, ऊडॉल्फ फर्नाडिस आणि राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे.
Advertisement
Advertisement