For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजय सिंह यांच्या याचिकेवर ‘सर्वोच्च’कडून ईडीला नोटीस

06:12 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
संजय सिंह यांच्या याचिकेवर ‘सर्वोच्च’कडून ईडीला नोटीस
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरणी तिहारमध्ये दाखल आप नेते संजय सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस पाठवली आहे. आपल्या रिमांड आणि अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळत दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात संजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या अटकेला आणि कोठडीत ठेवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्र आणि अंमलबजावणी संचालनालय यांना नोटीस बजावली असून अटकेबाबत त्यांची प्रतिक्रिया मागवली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि भाटी यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 11 डिसेंबर 2023 पर्यंत संजय सिंहच्या अटकेच्या याचिकेवर केंद्र आणि ईडीकडून उत्तर मागितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.