For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नीट-एसएस’ संबंधीच्या याचिकेवर केंद्राला नोटीस

11:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नीट एसएस’ संबंधीच्या याचिकेवर केंद्राला नोटीस
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

‘नीट-एसएस’ परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यासंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार, वैद्यकीय समुपदेशन समिती (एमसीसी) आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) यांच्याकडून उत्तर मागितले. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाकडे नीट-एसएस परीक्षा 2024 जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर यासंबंधीची सुनावणी झाली. 13 उमेदवारांच्यावतीने ही याचिका सादर केली असून पुढील सुनावणी 26 जुलै रोजी होणार आहे.

‘एनएमसी’ने यंदा परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या चर्चांवरून नीट-एसएस परीक्षा जानेवारी 2025 मध्ये होण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. एमडी, एमएस आणि डीएनबी सारख्या पदव्युत्तर पदवी किंवा सुपर-स्पेशालिटी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी समकक्ष पात्रता असलेले डॉक्टर राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-सुपर स्पेशालिटी (नीट-एसएस) परीक्षा देऊ शकतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.