For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरविंद केजरीवालांच्या सचिवाला नोटीस

07:00 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरविंद केजरीवालांच्या सचिवाला नोटीस
Advertisement

महिला खासदाराला मारहाण केल्याचा आरोप : राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना नोटीस बजावत शुक्रवारी हजर राहण्यास सांगिताले आहे. विभव कुमार यांच्यावर आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाति मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. विभव कुमार यांना शुक्रवारी म्हणजेच 17 मे रोजी सकाळी 11 वाजता आयोगासमोर उपस्थित राहण्याचा निर्देश देण्यात आला आहे. विभव कुमारने मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी गैरवर्तन केल्याचा आरोप मालिवाल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केला होता. तर तत्पूर्वी पोलिसांच्या हेल्पलाइनवर कॉल करत केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याची तक्रार नोंदविली होती. याची दखल घेत आयोगाने विभव कुमारला समन्स बजावला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी तेथे आपल्याला मारहाण झाल्याची माहिती पीसीआर कॉलवर दिली होती. मालिवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात पोहोचून अधिकाऱ्यांना घटनेची तोंडी माहिती दिली होती.  तर लेखी तक्रार नंतर नोंदविणार असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांना नोटीस जारी करत तीन दिवसांमध्ये कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. परंतु याप्रकरणी आम आदमी पक्षाकडून कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Advertisement

मालिवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

गैरवर्तनाच्या आरोपाप्रकरणी मालिवाल यांचे वक्तव्य नोंदवून घेण्यासाठी दिल्ली पोलीस अधिकारी गुरुवारी त्यांच्या घरी पोहोचले होते. तर दुसरीकडे महिला खासदाराला मारहाण केल्याचा आरोप असलेले विभव कुमार हे गुरुवारी लखनौ विमानतळावर केजरीवालांसोबत दिसून आले आहेत. विभव कुमार यांना केजरीवालांकडून अभय मिळाल्याचा आरोप आता भाजपकडून केला जात आहे.

Advertisement
Tags :

.