For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आप’च्या आणखी एका आमदाराला नोटीस

06:17 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘आप’च्या आणखी एका आमदाराला नोटीस
Advertisement

मुख्याध्यापक धमकीप्रकरणी उच्च न्यायालयाचे पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सीलमपूरमधील आप आमदार अब्दुल रहमान आणि त्यांची पत्नी अस्मा बेगम यांना एका प्रकरणात नोटीस बजावली आहे. सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांना धमकावण्याचा आणि हल्ला केल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे. यासंदर्भात पीडितेचे अपील मान्य करताना उच्च न्यायालयाने दोघांनाही नोटीस बजावली आहे.

Advertisement

विशेष खासदार/आमदार न्यायालयाने आमदार अब्दुल रहमान आणि त्यांच्या पत्नीला दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना प्रोबेशनवर सोडले होते. याप्रकरणी पीडित प्राचार्याने आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपीला नोटीस बजावून त्याचा जबाब मागवला आहे.

सीलमपूरमधील आप आमदार अब्दुल रहमान यांच्याविरोधातील हा खटला 4 फेब्रुवारी 2009 चा आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारी 2009 रोजी आमदार अब्दुल रहमान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. आमदार आणि त्यांच्या पत्नीवरील आरोप सिद्ध करण्यात फिर्यादीला यश आले आहे. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 353/506 आणि 34 च्या आधारे या प्रकरणात आमदाराला दोषी ठरवले, तर आमदाराची पत्नी आस्मा यांच्यावर कलम 332 अंतर्गत आरोप सिद्ध झाले. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने गेल्यावषी आपला निकाल दिला होता.

Advertisement
Tags :

.