For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरशिंगेत स्वयंचलित हवामान केंद्र लवकरात लवकर सुरू करा

05:53 PM Dec 12, 2023 IST | अनुजा कुडतरकर
शिरशिंगेत स्वयंचलित हवामान केंद्र लवकरात लवकर सुरू करा
Advertisement

प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या कृषी आयुक्त व कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

सावंतवाडी मंडळतील हवामान व माडखोल मंडळातील हवामान यामध्ये तफावत आहे.माडखोल मंडळातील माडखोल हे गाव भौगोलिक दृष्टया सावंतवाडी मंडळाच्या जवळचे असले तरी माडखोल मंडळातील शिरशिंगे,कलंबिस्त, वेर्ले, ओवळीये,कारीवडे,माडखोल हि  गावे आंबोलीच्या पायथ्याशी असून  भौगोलीक दृष्टया नजीक आहेत. आंबोली मंडळातील हवामान व माडखोल मंडळातील हवामान यात  साम्यता आहे.मात्र सावंतवाडी  स्वयंचलित हवामान केंद्र हे सावंतवाडी शहरामध्ये येत असून  शहरामधील हवामान व गावातील हवामान यात  भिन्नता आहे. त्यामुळे माडखोल मंडळ भागातील शेतकऱ्यांना काजू पीक विमा नुकसान भरपाई बाबतचा अहवाल तयार करा आणि कृषी आयुक्त व कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठवून द्या अशा सूचना प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी केल्या . शिरशिंगे येथे मंजूर झालेले स्वयंचलित हवामान केंद्र लवकरात लवकर सुरू करा असेही त्यांनी स्पष्ट केले. या भागातील शेतकऱ्यांनी आम्हाला काजू पीक विम्याची भरपाई यंदा मिळायलाच हवी. त्यासाठी आम्हाला आंबोली मंडळ विभागाशी सलग्न करा. ज्यावेळी शिरशिंगेत स्वयंचलित पर्जन्यमान केंद्र होईल. त्यावेळी माडखोल मंडळ समाविष्ट करा असेही स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी या भागातील काजू पीक विमा धारकांना नुकसान भरपाई मिळायलाच हवी यासाठी वेळ पडल्यास कृषी आयुक्तांची आपण बोलेन असेही सुचित केले. माडखोल महसूल मंडळातील माडखोल, कारिवडे कलंबिस्त, शिरशिंगे ,ओवळीये , वेर्ले या भागातील शेतकऱ्यांना काजू पीक विमा प्राप्त झालेले नाहीत , यासंदर्भात प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या समवेत आज या शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी आमदार राजन तेली यांनी केले . यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील व विमा कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी संजय राऊळ ,राजन राऊळ ,महादेव राऊळ, सुरेश आडाळकर ,अशोक राऊळ, सुरेश शिर्के, बाळू सावंत ,चंद्रकांत सावंत, श्री देसाई ,प्रशांत देसाई, श्री धोंड ,सरपंच दीपक राऊळ, सुबोध कारिवडेकर ,सुरेश आडेलकर, विजय बंड, प्रकाश नाईक सुमंत राऊळ, सुबोध राऊळ ,विश्वास राऊळ ,आत्माराम लातये, मंगेश राऊळ, नारायण म्हाडगूत ,सिद्धेश तायशेटे , स्वप्नाली राऊळ ,अनुसया सावंत, उदय सावंत ,नारायण राऊळ ,आधी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.