For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतदान केंद्रावर ध्वजारोहण करण्याची सूचना

11:43 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मतदान केंद्रावर ध्वजारोहण करण्याची सूचना
Advertisement

जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे : नवमतदारांना गुलाब देऊन प्रोत्साहन

Advertisement

बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेतील मतदान केंद्राला जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी भेट देऊन मतदान केंद्रावर ध्वजारोहण केले. यावेळी नवमतदारांचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले. ‘आमचे पाऊल मतदान केंद्राकडे’ या उपक्रमांतर्गत ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची नोंद घेण्यात आली. त्यानुसार मतदान केंद्रावर त्यांना बोलावून गुलाब देऊन स्वागत केले. नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. कोणीही न चुकता मतदान करावे, असे आवाहन करून मतदान केंद्रावर ध्वजारोहण करण्याची सूचनाही त्यांनी केली. यानंतर सक्तीने मतदान करावे यासाठी शपथ देवविली. यावेळी जिल्हा योजनाधिकारी डॉ. एम. कृष्णराजू, ता. पं. कार्यकारी अधिकारी रामरे•ाr पाटील, साहाय्यक गणेश, जि. पं. योजनाधिकारी प्रमोद गोडेकर, बाहुबली मेळवंकी, दत्तात्रय चव्हाण, पीडीओ गोपाल नायक, बीएलओ, सीएलओ, शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ, ग्रा. पं. सदस्य आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.