For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नथिंगचे देशातले पहिले, जगातले दुसरे फ्लॅगशिप स्टोअर बेंगळूरात

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
नथिंगचे देशातले पहिले  जगातले दुसरे फ्लॅगशिप स्टोअर बेंगळूरात
Advertisement

स्टोअरमध्ये स्मार्टसह इतर उत्पादने मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/बेंगळूर

युनायटेड किंगडममधील टेक्नॉलॉजी कंपनी नथिंग यांचे भारतातले पहिले फ्लॅगशिप स्टोअर लवकरच लॉन्च केले जाणार असल्याची माहिती आहे. सदरचे पहिले फ्लॅगस्टिप स्टोअर देशाची आयटी राजधानी असणाऱ्या कर्नाटकातील बेंगळूर येथे होणार असल्याचे समजते. कंपनीने लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. नथिंगचे हे भारतातील पहिले फ्लॅगशिप स्टोअर जागतिक तुलनेमध्ये पाहता नथिंगचे हे दुसरे फ्लॅगशिप स्टोअर असणार आहे. या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये एक खास जागा रचण्यात आली असून तेथे कंपनीची उत्पादने ग्राहकांना वापरून पाहता येणार आहेत. यामध्ये स्मार्टफोन, ट्रू वायरलेस इयर बर्डस आणि इतर उत्पादने खरेदी करण्याची संधी असणार आहे. उत्पादने खरेदी करण्याआधी ती उत्पादने वापरण्याची संधी मिळणार आहे. जेणेकरुन ग्राहकांना उत्पादन खरेदीबाबतचा निर्णय अंतिम करणे सोपे होणार आहे.

Advertisement

एकमेव स्टोअर कोठे

कंपनीचे एकमेव पहिलेवहिले फ्लॅगशिप स्टोअर लंडनमध्ये कार्यरत आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतात नथिंग कंपनीच्या स्मार्टफोनना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. काही वर्षापासून कंपनीने स्मार्टफोनची शिपमेंटमध्ये सुद्धा वेगाने वाढ केलेली आहे.

Advertisement
Tags :

.