महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अम्ब्रेला ऑर्गनायझेशनकडून मराठा बँकेच्या योगदानाची नोंद

10:41 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : नॅशनल अर्बन को-ऑप. फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनयुसीएफडीसी - अम्ब्रेला ऑर्गनायझेशन) या संरक्षण संस्थेचे उद्घाटन नवी दिल्ली विज्ञान भवन येथे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. या संरक्षण संस्थेच्यावतीने मराठा बँकेने दिलेल्या योगदानाबाबत बँकेचे चेअरमन दिगंबर पवार व संचालक बाळासाहेब काकतकर यांचा केंद्रीय मंत्री अमित शहा, अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचे चेअरमन जितेंद्र मेहता, सेक्रेटरी अतुल खिरवाडकर यांच्या उपस्थितीत रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्नाटक राज्यातून सात बँकांचा यामध्ये समावेश होता. अम्ब्रेला ऑर्गनायझेशन या संरक्षण संस्थेच्या उभारणीत मराठा बँकेने दिलेल्या योगदानाबाबत नोंद घेण्यात आली. याबद्दल बँकेचे सहकार क्षेत्रासह सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article