For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदारकी नाहीच, १० हजारही गेले

01:38 PM Nov 25, 2024 IST | Pooja Marathe
आमदारकी नाहीच  १० हजारही गेले
Not only MLAs, but even 10 thousand have gone.
Advertisement

डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची स्थिती

Advertisement

121 पैकी केवळ 23 उमेदवारांची डिपॉझिट वाचली

कोल्हापूर

Advertisement

विधानसभेच्या निवडणूकीसाठी आगदी उत्साहामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थकांनीही ...साहेब यंदा तुम्हीच जिंकणार आणि आमदारही होणार असा विश्वासही व्यक्त केला. प्रत्यक्षात निकालानंतर पराभवाला समोरे जावे लागले. निवडणूकी दरम्यान खिसा रिकामा झाला तरी आमदारकी नाहीच, डिपॉझिट भरलेले दहा हजारही गेले, अशी स्थिती कोल्हापुरातील दहा मतदार संघातील डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांची झाली आहे.

कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असो की सर्वसामान्य नागरिक. त्यांचे एकदा तरी आमदार व्हावे, असे स्वप्न असते. परंतू हे स्वप्न सर्वांचेच सत्य होत असे नाही.  निवडणूकीमध्ये खिसा रिकामा होतोच पण पराभूत झाल्यानंतर धक्काही बसतो. असे असले तरी काहीजण जिद्द काही सोडत नाहीत. कुवत नसतानाही काहीजण विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरतात.

यंदाही कोल्हापुरातील दहा मतदार संघासाठी 201 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. काही उमेदवारांनी आपल्यास अडचण ठरणाऱ्या उमेदवारांना माघार घेण्यास लावली. यामध्ये ‘लक्ष्मीदर्शन’ही घडविल्याची चर्चा आहे. तर काहींनी  शब्दाला मान देत माघार घेतली. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तर कोल्हापूर उत्तरमध्ये नाट्यामय घडामोडी घडल्या. अखेर दहा मतदार संघात 121 उमेदवार रिंगणात राहिले. यामध्ये काहींनी विरोधी उमेदरावासोबत तडजोड झाली नसल्याने अर्ज माघार घेतला नाही. यापैकी दहा उमेदवार निवडून आले तर 111 उमेदवारांना पराभवाला समोरे जावे लागले. यामध्ये विजय झालेल्या दहा उमेदवारांसह 23 उमेदवारांची डिपॉझिट जप्त होण्यापासून वाचली आहे. परंतु मते कमी पडल्याने  98 उमेदवारांना डिपॉझिट जप्त झाली आहे. यामध्ये चंदगड आणि हातकंणगले मतदार संघात सर्वाधिक प्रत्येकी 14 उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 हजार आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांना 5 हजार डिपॉझिट आहे.  5 लाखाहून अधिक रक्कम जप्त झाली आहे.

मतदार संघ                 डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार  
कोल्हापूर दक्षिण --------------- 9
कोल्हापूर उत्तर ---------------  9
कागल           ----------------  9
राधानगरी       ---------------  5
शिरोळ         ---------------    8
हातकणंगले    --------------    14
इचलकरंजी     --------------    11
चंदगड          ---------------    14
करवीर         ----------------     9
शाहूवाडी      ----------------    10

Advertisement
Tags :

.