नितीश कुमारांच्या संपर्कात नाही : लालूप्रसाद
पाटणा :
बिहार निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना एकीकडे रालोआच्या नेत्यांनी ही निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच लढत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. याचदरम्यान राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे स्वत:चे पुत्र तेजस्वी यांच्या विजयावरून अत्यंत आश्वस्त दिसून येत आहेत. लालूप्रसादांनी एका मुलाखतीत नितीश कुमारांच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आम्ही यावेळी नितीश कुमार यांच्या सरकारला हटविणार आहोत. मतमोजणीनंतर बहुमताचा आकडा न मिळाला तरीही आम्ही नितीश कुमार यांना स्वीकार करणार नाही, आम्ही नितीश कुमारांच्या संपर्कात नाही असा दावा लालूप्रसाद यांनी केला आहे. 2015 आणि 2022 साली संजदने राजदसोबत आघाडी केली होती. संजद-राजदच्या सरकारमध्ये तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले हेते.