विजयसोबत रिलेशनशिपमध्ये नाही : फातिमा
चांगले युवक सध्या भेटतात कुठे?
अभिनेता विजय वर्मा हा तमन्ना भाटियासोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिला होता. विजय आणि तमन्नाच्या ब्रेकअपमुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तर विजय पुन्हा प्रेमात पडल्याचा दावा करण्यात येत होता. विजयचे नाव अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडले हेते. विजय आणि फातिमा यांना अलिकडेच एका कॅफेत एकत्र पाहिले गेले होते. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपविषयी चर्चा सुरू झाली होती.
तर या चर्चेला फातिमानेच पूर्ण विराम दिला आहे. विजय वर्मासोबत आपण रिलेशनशिपमध्ये नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तसेच डेटिंगसाठी सध्या चांगले युवक भेटतात कुठे असे वक्तव्यही तिने केले आहे. विजय आणि फातिमा हे गुस्ताख इश्क या चित्रपटात काम करत आहेत. दोघांच्या या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहे.
विजय आणि तमन्ना हे लस्ट स्टोरी 2 च्या सेटवर भेटले होते. यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. परंतु दोघांच्या ब्रेकअपचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण तमन्ना ही लवकर विवाहबद्ध होण्यासाठी आग्रही होती, तर विजयचा याला नकार होता असे समजते.