For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलीगढ नव्हे तर आता ‘हरिगढ’

06:47 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
अलीगढ नव्हे तर आता ‘हरिगढ’
Advertisement

उत्तरप्रदेशातील जिल्ह्याचे नाव बदलणार

Advertisement

वृत्तसंस्था/ अलीगढ

उत्तरप्रदेशच्या अलीगढ जिल्ह्याचे नाव बदलून हरिगढ करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेच्या बैठकीत एकमताने संमत झाला आहे. हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.

Advertisement

एका नगरसेवकाकडून अलीगढचे नाव बदलून हरिगढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर झाला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारकडून लवकरच मंजुरी मिळेल अशी अपेक्षा असल्याचे महापौर प्रशांत सिंघल यांनी म्हटले आहे. 21 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे अलीगढच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अलीगढचे नाव बदलण्याचे संकेत दिले होते.

अलीगढचे नाव हरिगढ करण्याची मागणी दीर्घकाळापासून उपस्थित केली जात आहे. विशेषकरून भाजपचे नेते ही मागणी वारंवार करत होते. अलीगढ हे उत्तरप्रदेशातील एक महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र आहे. स्वत:च्या कुलुपांच्या उद्योगासाठी अलीगढ जगभरात ओळखले जाते. याचबरोबर अलीगढ हे मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध आहे. अलीगढ जिल्हा शैक्षणिक संस्थांसाठी देखील देशभरात ओळखला जातो.

Advertisement
Tags :

.