महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फिंगरप्रिंट नव्हे तर बेट

06:30 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका बेटाला आकाशातून पाहिले गेल्यास ते जणू फिंगरप्रिंट किंवा थंब इम्प्रेशन असल्याचे दिसून येते. परंतु हे एक बेट असून ते अंगठा किंवा बोटांवर असलेल्या रेषांप्रमाणे दिसून येते. क्रोएशिया हा देश जितका सुंदर आहे, तितकाच तेथे निसर्गाचा चमत्कार दिसून येतो. येथे जर हृदयाच्या आकारातील बेट आहे, तसेच फिंगरप्रिंटसारखे बेट देखील आहे. बॅव्लजेनिक बेटाची निर्मिती एखाद्या फिंगरप्रिंटप्रमाणे करण्यात आली आहे. गुगल अर्थच्या पिक्चर्समध्ये हे स्पष्टपणे अंगठ्याच्या छापाप्रमाणे दिसून येत असते.

Advertisement

शेतकऱ्यांमुळे डिझाइन

Advertisement

एड्रियाटिक सीवर बॅव्लजेनिक बेट आहे, हे बेट एखाद्या अंगठ्याप्रमाणे किंवा बोटाच्या ठशांप्रमाणे दिसते. हे बेट सिबेनिक आर्किपेलागोच्या 249 बेटांपैकी एक ओ. या बेटाचा वापर नजीकच्या कॅप्रिजे बेटावरील शेतकरी शेतीसाठी करत असतता. या ठिकाणी त्यांनी दगडांच्या भिंती निर्माण केल्या असून त्यांची रचना फिंगरप्रिंटसारखी केलेली आहे. या भिंतींना 1800 साली निर्माण करण्यात आले होते. या भिंतींना ड्राय स्टोन वॉलिंग तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आले आहे. यातील दगडांना अत्यंत काळजीपूर्वक परस्परांमध्ये लॉक करण्यात आले आहे.

23 किलोमीटर लांबीच्या भिंती

स्वत:च्या खास डिझाइनमुळे याला फिंगरप्रिंट आयलँड देखील म्हटले जाते. हे बेट 0.14 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात वसलेले आहे. दगडांच्या भिंतींना एकत्र करण्यात आल्यास याची एकूण लांबी 23 किलोमीटर इतकी होती. क्रोएशियन नॅशनल टूरिस्ट बोर्डानुसार ये बेट आयलँड एंड्रायाटिक समुद्रात असून येथे पिकं घेतली जात होती. येथे राहणारे लोक पूर्णपणे शाकाहारी होते. येथे साइट्रस ट्रीजची लागवड करण्यात आली आहे. पूर्ण बेटावर दगडाच्या भिंतींचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. पिकांना जोरदार वाऱ्यांपासून वाचविणे हा यामागील उद्देश होता. पूर्ण शेतीला वेगवेगळ्या प्लॉट्समध्ये विभागून भिंती तयार करण्यात आल्या आहेत. 2018 पासून या भिंतींना संरक्षित करण्यात आले आहे. हे ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article