For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान

06:55 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान
Advertisement

2016 पासून 32 देशांनी केले सन्मानित : आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी वाढवली देशाची प्रतिष्ठा

Advertisement

वृत्तसंस्था/ ओस्लो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी नॉर्वेचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा त्यांच्यासाठी मिळालेला आणखी एक महत्त्वाचा सन्मान ठरला आहे. नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान, ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला आतापर्यंतचा 32 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

Advertisement

सध्या विदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च सन्मानही प्रदान करण्यात आला होता. रविवारी रात्री स्वीडनने पंतप्रधान मोदींना आपला अत्यंत प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक सन्मान, ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ देऊन गौरवले होते. स्वीडनच्या राजकुमारी व्हिक्टोरिया यांनी पंतप्रधान मोदींना हा सन्मान प्रदान केला. भारत आणि स्वीडन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेल्याबद्दल व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत केल्याबद्दल आणि दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक दृढ केल्याबद्दल पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्यात आला. याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींना यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरविण्यात आलेले आहे.

पंतप्रधानांना मिळालेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार

सौदी अरेबिया: किंग अब्दुलअजीज सॅश

अफगाणिस्तान: गाझी अमीर अमानुल्ला खान

पॅलेस्टाईन: ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन

संयुक्त अरब अमिराती : ऑर्डर ऑफ झायेद

रशिया : ऑर्डर ऑफ सेंट अँड्य्रू द अपोस्टल

मालदीव: निशन इझुद्दीन

बहरीन: किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स

संयुक्त राष्ट्र : लीजन ऑफ मेरिट

भूतान: ऑर्डर ऑफ द द्रुक ग्याल्पो

पापुआ न्यू गिनी: अबक्कल अवॉर्ड

फिजी: कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी

पापुआ न्यू गिनी: ऑर्डर ऑफ लोगोहू

इजिप्त: ऑर्डर ऑफ द नाईल

फ्रान्स: ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर

ग्रीस: ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर

डोमिनिका: डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर

नायजेरिया: ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर

गयाना: ऑर्डर ऑफ एक्सलन्स

बार्बाडोस: ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस

कुवेत: मुबारक अल-कबीर ऑर्डर

मॉरिशस: ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशनचे ग्रँड कमांडर

श्रीलंका: श्रीलंका मित्र विभूषणया

सायप्रस: ऑर्डर ऑफ मकारिओस-3 ग्रँड क्रॉस

घाना: ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना

त्रिनिदाद आणि टोबॅगो: ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो

ब्राझील: नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसचे ग्रँड कॉलर

इस्त्रायल: स्पीकर ऑफ द क्नेसेट मेडल

ओमान: ऑर्डर ऑफ ओमान

इथिओपिया: द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया

नामिबिया: ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्व्हिटशिया मिराबिलिस

स्वीडन: रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार

नॉर्वे : ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट

Advertisement
Tags :

.