For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर विभागाला 171 धावांची आघाडी

06:22 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तर विभागाला 171 धावांची आघाडी
Advertisement

अबिद मुस्ताक, अर्शदीप सिंग यांची चमक

Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

येथे सुरू असलेल्या 2026 च्या क्रिकेट हंगामातील दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर उत्तर विभागाने आपली स्थिती अधिक भक्कम करताना पश्चिम विभागावर 171 धावांची आघाडी मिळविली आहे. या सामन्यात उत्तर विभागाचे प्रतिनिधीत्व करताना जम्मू काश्मीरचा फिरकी गोलंदाज अबिद मुस्ताकने 5 गडी बाद केले. तर त्याला अर्शदीप सिंगकडून चांगली साथ लाभली. अर्शदीप सिंगने 3 गडी बाद केले.

Advertisement

या सामन्यामध्ये उत्तर विभागाचा पहिला डाव 251 धावांत आटोपला. त्यानंतर पश्चिम विभागाने 2 बाद 31 या धावसंख्येवरुन खेळला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डाव 187 धावांत आटोपला. मुलानीने एकाकी लढत देत 52 धावा जमविल्या. मुशीर खानने 31 धावा केल्या. अबिद मुस्ताकने पश्चिम विभागाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, उर्विल पटेल आणि मुशीर खान यांना झटपाट बाद केल्याने त्यांची स्थिती 5 बाद 70 अशी केविलवाणी झाली. मुशीर खानने 126 चेंडूत 31 धावा जमविल्या. मुलानी कोटीयान आणि शार्दुल ठाकुर यांची मदत घेत अर्धशतक झळकविले. कोटियानने 8 तर ठाकुरने 9 धावा केल्या. तुषार देशपांडेने 2 षटकार खेचल्याने पश्चिम विभागाला 187 धावांपर्यंत मजल मारता आली. अबिद मुस्ताकने 39 धावांत 5 तर अर्शदीप सिंगने 53 धावांत 3 गडी बाद केले. उत्तर विभागाने पहिल्या डावांत 64 धावांची आघाडी घेतली.

64 धावांची आघाडी मिळविल्यानंतर उत्तर विभागाने दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 107 धावा जमवित एकूण 171 धावांची बढत घेतली आहे. आयुष बडोनी 39 धावांवर खेळत आहे. अब्दुल समादने 30 धावा केल्या. पश्चिम विभागातर्फे कोटियान आणि मुलानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक: उत्तर विभाग प. डाव 251, पश्चिम विभाग प. डाव सर्वबाद 187 (मुलानी 52, मुशीर खान 31, अबिद मुस्ताक 5-39, अर्शदीप सिंग 3-53), उत्तर विभाग दु. डाव 4 बाद 107 (बडोनी खेळत आहे 39, समाद 30, कोटियान व मुलानी प्रत्येकी 2 बळी).

Advertisement
Tags :

.