For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणच्या क्षेपणास्त्रांमध्ये उत्तर कोरियाचे तंत्रज्ञान

06:01 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणच्या क्षेपणास्त्रांमध्ये उत्तर कोरियाचे तंत्रज्ञान
Advertisement

किंम जोंगच्या देशाच्या मदतीने मध्यपूर्वेत धुमाकूळ

Advertisement

इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत स्वत:ची क्षेपणास्त्र शक्ती दाखवून दिली आहे. इराणच्या क्षेपणास्त्रांसाठी उत्तर कोरियाकडून तंत्रज्ञान मिळविण्यात आल्याच दावा एका तज्ञांनी केला आहे. इराणने अमेरिकेच्या डिएगो गार्सिया येथील सैन्यतळाच्या दिशेनेही क्षेपणास्त्र डागले होते. हे क्षेपणास्त्र मुसुदान श्रेणीचे होते. मुसुदान क्षेपणास्त्र उत्तर कोरियाने विकसित केले आहे. इराणने 2005 साली अशाप्रकारची 19 क्षेपणास्त्रs उत्तर कोरियाकडून खरेदी केली होती.

इराणने 1990 च्या दशकात उत्तर कोरियाकडून 9 डॉन्ग क्षेपणास्त्रs प्राप्त केली होती. यानंतर इराणने स्वत:च या तंत्रज्ञानावर काम केले. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने इराणने इमाद आणि कादर क्षेपणास्त्र निर्माण केले. इराणकडे 1 हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारी कमी पल्ल्याची आणि 3 हजार किलोमीटर पर्यंत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रs आहेत. तर दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर इराण काम करत आहे.

Advertisement

उत्तर कोरिया-इराणचे सहकार्य

-इराण अन् उत्तर कोरिया यांच्यातील संरक्षण सहकार्य दशकांपेक्षा जुने आहे. उत्तर कोरिया शस्त्रास्त्रs पुरवितो, इराण त्याला कच्च्या तेलाच्या रुपात मदत करतो.

-आखाती देशांवर हल्ल्यासाठी इराणने वापरलेली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs क्यूआयएएम प्रणालीवर आधारित. ही प्रणाली उत्तर कोरियाच्या समर्थनाने विकसित.

Advertisement
Tags :

.