अमेरिकेच्या सैन्यतळांची उत्तर कोरियाकडून हेरगिरी
हेर उपग्रहाद्वारे सैन्यतळांची छायाचित्रे मिळविली व्हाइट हाउस, पेंटागॉनची रेकी
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाने अलिकडेच स्वत:चा पहिला हेर उपग्रह प्रक्षेपित केला होता. या उपग्रहाच्या मदतीने उत्तर कोरियाकडून अमेरिकेचे सैन्यतळ, व्हाइट हाउस आणि संरक्षण मंत्रालय पेंटागॉनची रेकी केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. उपग्रहाच्या मदतीने या ठिकाणांची छायाचित्रे उत्तर कोरियाने मिळविली आहेत.
अमेरिकेतील प्रांत व्हर्जिनिया येथील सैन्यतळ, विमानवाहू युद्धनौकांची हेरगिरी करण्यात आली आहे. याचबरोबर इटलीची राजधानी रोमसोबत दक्षिण कोरियातील सैन्यतळांची देखील छायाचित्रे मिळविण्यात आली आहेत. अमेरिकेच्या नॉरफॉक नौदल तळ आणि न्यूपोर्ट न्यूज डॉकयार्डचे काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये अमेरिकेचे 7 न्यूक्लियर कॅरियर आणि एक ब्रिटिश विमानवाहू युद्धनौका दिसून आली आहे.
अमेरिकेच्या स्तरावरच आम्ही स्वत:ची शस्त्रास्त्रs आणि तंत्रज्ञान विकसित करणे हा उत्तर कोरियाचा हक्क असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील उत्तर कोरियाच्या प्रतिनिधी किम सोंग यांनी म्हटले आहे.
किम यांचे दाव अमेरिकेच्या प्रतिनिधी लिंड ग्रीनफील्ड यांनी फेटाळला आहे. आमचा युद्धाभ्यास पूर्वीपासूनच निर्धारित होता, हा युद्धाभ्यास केवळ संरक्षणात्मक स्वरुपाचा असतो असे ग्रीनफील्ड यांनी नमूद पेले आहे.
उत्तर कोरियासोबत सशर्त चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत असेही त्यांनी म्हटले. यावर किम सोंग यांनी जोपर्यंत अमेरिकेकडून निर्माण झालेला सैन्य धोका दूर होत नाही तोवर उत्तर कोरिया स्वत:ची सैन्यक्षमता वाढवत राहणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
उत्तर कोरियाला रशियाकडून सहाय्य
रशियाने हेर उपग्रहाच्या यशस्वी प्र्रशिक्षणात उत्तर कोरियाला मदत केली होती असा दावा दक्षिण कोरियाच्या हेरयंत्रणेने केला आहे. उत्तर कोरिया तिसऱ्या प्रयत्नात हेर उपग्रह प्रक्षेपित करण्यास यशस्वी ठरला होता. उत्तर कोरियाने युक्रेन युद्धात मदतीसाठी रशियाला शस्त्रास्त्रs पुरविली असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.