For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर विभागाचा उपांत्य फेरीत प्रवेश

06:42 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तर विभागाचा उपांत्य फेरीत प्रवेश
Advertisement

दुलीप करंडक स्पर्धा, अबिद मुस्ताक सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था, बेंगळूर

डावखुरा फिरकी गोलंदाज अबिद मुस्ताकच्या शानदार कामगिरीच्या जोरावर येथे बुधवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी उत्तर विभागाने पश्चिम विभागाचा 52 धावांनी पराभव करून दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

Advertisement

पश्चिम विभागाला विजयासाठी उत्तर विभागाकडून 287 धावांचे आव्हान मिळाले होते. पश्चिम विभागाने 7 बाद 220 या धावसंख्येवरुन शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि उत्तर विभागाचे फिरकी गोलंदाज अबिद मुस्ताक व निशांत सिंधू यांनी पश्चिम विभागाचे शेवटचे तीन गडी केवळ 6.3 षटकांत बाद करून आपल्या संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले. उत्तर विभागाने बुधवारी तासभर कालावधीतच हा विजय नोंदविला. उर्विल पटेलने 25 धावा जमविल्या. पश्चिम विभागाचा 57.3 षटकांत 234 धावांत आटोपला.

उत्तर विभागाच्या अबिद मुस्ताकने पश्चिम विभागाच्या दुसऱ्या डावात 60 धावांत 4 गडी बाद केले. त्याने तुषार देशपांडेला 5 धावांवर झेलबाद केले. या सामन्यामध्ये अबिद मुस्ताकने पहिल्या डावात 5 गडी बाद केले. तर त्याने दुसऱ्या डावात 4 बळी मिळविले. 99 धावांत 9 बळी मिळविणाऱ्या अबिद मुस्ताकला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. पश्चिम विभागाच्या दुसऱ्या डावात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि मुशीर खान यांनी 111 धावांची शतकी भागिदारी केली होती. पश्चिम विभागाची एक वेळ स्थिती 3 बाद 95 अशी भक्कम होती. पण त्यानंतर उत्तर विभागाच्या फिरकीसमोर पश्चिम विभागाचे 4 फलंदाज केवळ 25 धावांत तंबूत परतले.

आता दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत 30 ऑगस्टपासून उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग तसेच पूर्व आणि मध्यविभाग यांच्यात उपांत्य फेरीचे सामने खेळविले जातील.

संक्षिप्त धावफलक: उत्तर विभाग प. डाव 251, पश्चिम विभाग प. डाव 187, उत्तर विभाग दु. डाव 222, पश्चिम विभाग दु. डाव 57.3 षटकांत सर्वबाद 234 (मुशीर खान 96, ऋतुराज गायकवाड 66, अबिद मुस्ताक 4-60).

Advertisement
Tags :

.