For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोरीस डच ग्रा प्री विजेता

06:22 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
नोरीस डच ग्रा प्री विजेता
Advertisement

वृत्तसंस्था, अॅमस्टरडॅम

Advertisement

रविवारी येथे झालेल्या 2026 च्या एफ-1 मोटार रेसिंग हंगामातील डच ग्रा प्री एफ-1 मोटर रेसिंग शर्यतीत लँडो नोरीसने आपल्या नजीकचे प्रतिस्पर्धी अँटोनेली तसेच रसेल आणि व्हर्स्टापन यांना मागे टाकत विजेतेपद पटकाविले. चालु वर्षीच्या मोटर रेसिंग हंगामातील नोरीसचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे.

ब्रिटनच्या लँडो नोरीस आणि मॅक्स व्हर्स्टापन यांच्यात चुरस अपेक्षित होती. मॅक्लेरन चालक नोरीसने शनिवारी या स्पर्धेच्या सराव सत्रामध्ये पोलपोझिशन पटकाविले होते. रविवारी झालेल्या या शर्यतीमध्ये नोरीसने 2.04.44.8 एवढा कालावधीत घेत नजीकचा प्रतिस्पर्धी तसेच मर्सिडीज चालक अँटोनेली आणि जॉर्ज रसेल यांना मागे टाकत विजेतेपद मिळविले. या शर्यतीमध्ये लेव्हिस हॅमिल्टनला चौथे तर चार्लस लेकरेक पाचव्या स्थानावर राहिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.