कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

06:55 AM Aug 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाऊस  रात्रंदिवस झोडपून काढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकासकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना पावसाची कोसळधार सुरु असल्याने बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून बाजारपेठ थंडावल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

रविवार दि. 17 पासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दि. 16 पासून मघा नक्षत्राला सुरुवात झाली असून 28 ऑगस्टपर्यंत हे नक्षत्र राहणार आहे. दरम्यानच्या काळात दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चार दिवसांपासून पाऊस अक्षरश: झोडपून काढत असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सखल भागात पाणी तुंबण्यासह कांदा मार्केट, गणपत गल्ली, रविवार पेठ, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी पाणी तुंबून राहिले आहे. संततधार पावसातच भाजी विक्रेते व इतर व्यावसायिकांना व्यवसाय करावे लागत आहे. सध्या बेळगाव शहर आणि तालुक्यात कोठेही अपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नसली तरीदेखील जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान पूरपरिस्थितीशी सामना करण्यास सज्ज आहे.

राकसकोप जलाशय क्षेत्रात मुसळधार पाऊस

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊससुरु असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून दोन दरवाज्यांच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सोमवारपेक्षा मंगळवारी मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदी पात्राबाहेर वाहू लागली आहे. परिणामी नदी काठावरील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप सुरुच असल्याने हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. गणेशोत्सव केवळ आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना पावसाची कोसळधार सुरु असल्याने सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर आगमन सोहळ्यावरही त्याचा परिणाम होत आहे.

शहरासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. मात्र रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने ख•dयात पावसाचे पाणी तुंबून राहत आहे.  वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने लहान मोठे अपघात घडत आहे. पावसाबरोबरच थंड वारा सुटल्याने नागरिक उबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडत आहेत. गेल्या चार दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article