‘थामा’मध्ये नोरा फतेहीचा आइटम सॉन्ग
स्री 2 चित्रपटानंतर मॅडॉक फिल्म्स पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये हॉरर-कॉमेडीपट सादर करणार आहे. हा चित्रपट दिवाळीदरम्यान प्रदर्शित होणार असला तरीही याच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. यापूर्वी रश्मिकाचे गाणे ‘तुम मेरे ना हुए’ने प्रेक्षकांची मने जिंकली असून आता डान्सिंग क्वीन नोरा फतेहीचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला केवळ 4 मिनिटांमध्ये 1 दशलक्ष आणि 1 तासांत 2 दशलक्ष ह्यूज प्राप्त झाले आहेत.
नोरा फतेहीला थामा चित्रपटातील ‘दिलबर की आंखो का’मध्ये आकर्षक नृत्य करण्याची संधी मिळाली आहे. रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील नोरा फतेहीच्या नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
थामा हा मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्सचा आगामी रोमँटिक कॉमेडी-हॉररपट आहे. याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने पेले असून लेखन नीरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फलारा यांनी केले आहे. चित्रपटात आयुष्मान हा आलोकच्या तर रश्मिका ही तडका या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यक्ष्माच्या भूमिकेत आहे. परेश रावल देखील यात दिसून येणार आहेत. याचबरोबर फैजल मलिक, गीता अग्रवाल, संजय दत्त, डायना पेंटी आणि विजय राज सहाय्यक भूमिकेत आहेत.