For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

नोरा फतेही आता दाक्षिणात्य चित्रपटात

06:39 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोरा फतेही आता दाक्षिणात्य चित्रपटात

कन्नड चित्रपटात मुख्य भुमिका साकारणार

Advertisement

अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये स्वत:च्या नृत्यकौशल्याद्वारे विशेष स्थान निर्माण केले आहे. नोरासाठी नवे वर्षे अत्यंत चांगले ठरत आहे. बॉलिवूड आणि तेलगू चित्रपटात काम केल्यावर नोरा आता कन्नड चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. केवीएन प्रॉडक्शनने आगामी दोन चित्रपटांसाठी नोराला करारबद्ध केले आहे.  नोरा पहिल्यांदाच एखाद्या कन्नड चित्रपटात काम करत असल्याने ती अत्यंत उत्सुक आहे.

नोराच्या पहिल्या कन्नड चित्रपटाचे नाव ‘केडी- द डेव्हिल’ असणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत संजय दत्त देखील दिसून येणार आहे. याचबरोबर शिल्पा शेट्टी, विजय सेतुपति हे देखील या चित्रपटाचा भाग असू शकतात.

Advertisement

नोराच्या पहिल्या कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम करणार आहेत. नोराची मेहनत आणि पात्रतेवर मला पूर्ण विश्वास आहे. ती पूर्णपणे झोकून देत स्वत:चे काम करते. नोरामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरेल असे उद्गार प्रेम यांनी काढले आहेत. पहिल्यांदाच मी एक नव्हे तर दोन कन्नड चित्रपटांमध्ये काम करणार आहे. या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांशी जोडून घेण्याची संधी मिळणार असल्याचे नोराने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.