For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोरा फतेहीला मिळाला तिचा ‘दिलबर’

06:23 AM Jan 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
नोरा फतेहीला मिळाला तिचा ‘दिलबर’
Advertisement

विदेशात राहतो प्रियकर

Advertisement

नोरा फतेहीने ‘साकी-साकी’, ‘दिलबर’ आणि ‘कुसू-कुसू’ या गाण्यांद्वारे बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही स्वत:चा ठसा उमटविला आहे. नोरा सातत्याने आंतरराष्ट्रीय संगीत जगत आणि बॉलिवूडमध्ये वाढत्या लोकप्रियतेदरम्यान संतुलन साधत आहे.

अभिनेत्रीला आता तिचा जोडीदार मिळाला आहे. या जोडीदारासोबत वेळ घालविण्यासाठी नोरा सातत्याने प्रवास करत आहे. नोराने 2022 साली फीफा वर्ल्डकपमध्ये परफॉर्म पेले होते. फुटबॉलशी तिचे जुने नाते आहे, परंतु आता फुटबॉलरने तिचे मन जिंकले आहे. नोरा फतेही एका कोट्याधीश फुटबॉलरला डेट करत असून त्याच्यावरील प्रेमापोटी ती आफ्रिकन कप ऑफ नेशन्समधील एका फुटबॉल सामन्यासाठी ती मोरक्को येथे पोहोचली होती.

Advertisement

नोराला या फुटबॉलरसोबत दुबई आणि मोरक्कोमध्ये अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. नोरा स्वत:चे नाते खासगी ठेवू इच्छित असल्याने तिने यासंबंधी वाच्यता केलेली नाही. नोराचे नाव यापूर्वी प्रिन्स नरुलासोबत जोडले गेले होते. तसेच अंगद बेदी, टेरेन्स लुईससोबतही ती रिलेशनशिपमध्ये होती.

Advertisement
Tags :

.