For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकमंत्री नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

05:08 PM Dec 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पालकमंत्री नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
Advertisement

कुडाळ -

Advertisement

राज्याचे मत्स्य ,बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए.कुलकर्णी यांनी बुधवारी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले.अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी केलेला विनंती अर्ज न्यायालयाने नाकारला.संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.२६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या ओबीसी आंदोलनात तत्कालीन आमदार व विद्यमान पालकमंत्री नितेश राणे सहभागी झाले होते.या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. नितेश राणे यांच्यासह आमदार निलेश राणे ,माजी आमदार राजन तेली व अन्य ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज झालेल्या सुनावणीला आमदार निलेश राणे व राजन तेली यांच्यासह अन्य संशयित उपस्थित होते, तर नितेश राणे यांच्यासह अन्य काहीजण गैरहजर राहिले.नितेश राणे न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजर राहिल्याने या प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.नितेश राणे अनुपस्थितीत राहीले.त्यांच्या वकिलांने केलेला विनंती अर्ज न्यायालयाने नाकारून अटक वॉरंट जारी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.