For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाईक, भाटीकर यांचे उमेदवारी अर्ज ग्राह्या

02:58 PM Mar 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाईक  भाटीकर यांचे उमेदवारी अर्ज ग्राह्या
Advertisement

आपच्या गितेश नाईक यांच्या अर्जाला आक्षेप : प्रतिज्ञापत्रात काही माहिती लपवल्याचा आरोप

Advertisement

फोंडा : फोंडा मतदारसंघासाठी 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी काल मंगळवार दि. 24 रोजी होऊन भाजपाचे उमेदवार रितेश रवी नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचे अर्ज ग्राह्या धरण्यात आले. मात्र आम आदमी पक्षाचे उमेदवार गितेश नाईक यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही माहिती लपवल्याचा आक्षेप घेण्यात आल्याने त्यावर आज निर्वाचन अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे.

आपचे उमेदवार गितेश नाईक यांनी उमेदवारी भरताना जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यात आपली संपूर्ण माहिती दिलेली नाही, असा आक्षेप काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर व त्यांचे वकील आमदार कार्लोस फेरेरा यांनी घेतला आहे. गितेश नाईक यांच्यावर कर्नाटक राज्यात काही गुन्हे दाखल करण्यात आले असून ते रद्द करावेत अशी याचिका त्यांनी न्यायालयात सादर केली आहे. उमेदवारी भरताना त्यांनी ही माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे आवश्यक होते. या मुद्द्यावर  हरकत घेतल्याने त्यावर आज बुधवार दि. 25 रोजी सकाळी 10.30 वा. निर्वाचन अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे.

Advertisement

उमेदवारांची मालमत्ता जाहीर  

तिन्ही उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता जाहीर केली असून त्यात सर्वाधिक रु. 4 कोटी 88 लाखांची स्थावर आणि जंगम मालमत्ता काँग्रेस उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी जाहीर केली आहे. भाजपा उमेदवार रितेश नाईक यांनी स्थावर आणि जंगम मिळून रु. 1 कोटी 55 लाखांची मालमत्ता जाहीर केली असून त्यात रोख रक्कम, गुंतवणूक, ठेवी आणि दागिन्यांचा समावेश आहे. आपचे गितेश नाईक यांनी रु. 3 कोटी 20 लाखांची एकूण मालमत्ता जाहीर केली आहे. त्याममध्ये 2.93 कोटींची जंगम मालमत्ता असून सुमारे रु 22 कोटी 19 लाखांचे कर्जही दाखविले आहे.

Advertisement
Tags :

.