For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महादेव पाटील यांना उमेदवारी

11:04 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महादेव पाटील यांना उमेदवारी
Advertisement

लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा सर्व ताकदीने लढण्याचा निर्धार

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी म. ए. समितीच्यावतीने महादेव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून पुन्हा एकदा सर्व ताकदीनिशी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. म. ए. समितीकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन म. ए. समितीने केले होते. त्यानुसार चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यामधील चंद्रकांत कोंडुस्कर यांनी माघार घेतल्याने तीन जण अर्ज शिल्लक होते. निवड कमिटीने महादेव पाटील यांचे नाव निश्चित करून जाहीर केले. सह्याद्री सोसायटीच्या सभागृहामध्ये कमिटीची बैठक झाली. 32 जणांची ही कमिटी होती. त्यामध्ये महादेव पाटील, साधना पाटील, आनंद आपटेकर या इच्छुकांचे अर्ज होते. त्यानंतर सर्वांची मते घेतली. त्यामध्ये महादेव पाटील यांना उमेदवारी देण्याचे ठरविण्यात आले. तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी नाव जाहीर केले. यावेळी या निवड कमिटीच्या अध्यक्षस्थानी अॅड. राजाभाऊ पाटील होते. शहर म. ए. समिती आणि तालुका म. ए. समितीची संयुक्त बैठक घेण्यात आली.

त्यानंतर इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी ही निवड जाहीर करण्यात आल्यानंतर सर्वच कार्यकर्त्यांनी अधिक मताधिक्क्याने महादेव पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार केला. शहर कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, आर. आय. पाटील, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. अमर येळ्ळूरकर, मदन बामणे, आर. एम. चौगुले, अंकुश केसरकर, शुभम शेळके, मनोहर हलगेकर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, सूरज कणबरकर, प्रमोद पाटील, रामचंद्र मोदगेकर, श्रीकांत कदम, सागर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीनंतर उमेदवारासह म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी तरुण भारतला भेट दिली. याचबरोबर संस्थापक स्व. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.