कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ध्वनिमर्यादेचे उल्लंघन,116 मंडळांवर खटले

01:10 PM Aug 02, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

सार्वजनिक गणेशोत्सव 25 दिवसांवर आला आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रशासनाने बैठक घेतली. यावेळी ध्वनिमर्यादेचे पालन करा, लेसरचा वापर करु नका, अशा सुचनाही केल्या आहेत. मात्र, 2023 मध्ये गणेशोत्सवात शहरात तब्बल 116 मंडळांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केले. तर लेसरचा वापर केल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात न्यायालयात खटले दाखल आहेत. अद्याप कारवाई प्रलंबित आहे.

Advertisement

गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत बहुतांश मंडळांकडून साऊंड सिस्टीमचा दणदणाट केला जातो. त्यातून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होते. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आवाजाच्या नोंदी घेतल्या जातात. गेली काही वर्षे हा नित्यक्रम बनला आहे. दरवर्षी कारवाईचा इशारा पोलिसांकडून दिला जातो आणि दरवर्षी ठरविक मंडळांकडून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होते.

गेल्यावर्षी पोलिसांनी जिह्यातील 479 मंडळांच्या ध्वनी यंत्रणांची तपासणी केली होती. त्यातील 300 मंडळांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. या सर्व मंडळांवर ठोस कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र, केवळ 38 मंडळांवर आरोपपत्र दाखल झाले. हे खटले सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. कारवाईच होत नसल्याने अनेक मंडळे यंदा पुन्हा साऊंड सिस्टीमचा दणदणाट करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

शहरात विविध सण, उत्सव, जयंतीच्या निमित्ताने साऊंडचा दणदणाट केला आहे. यामध्ये शहर पोलीस उपअधिक्षक कार्यालयाने 200 आवाजाचे नमुने घेतले आहेत. त्यापैकी 150 जणांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यापैकी 30 मंडळांवर खटले दाखल केले असून, 120 मंडळांना नोटीस पाठवल्या आहेत.

2023 मधील ध्वनिमर्यादा उल्लघंनाचे खटलेच अजून प्रलंबितआहेत. त्यामुळे तरुण मंडळांना कारवाईचा धाक उरलेला नाही. तसेच 2024 मधील 200 पैकी 30 खटले दाखल असून, 120 जणांना केवळ नोटीसच पाठवण्यात आल्या आहेत. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे तरुण मंडळांना कायद्याचा धाकच उरलेला नाही. त्यामुळे मंडळांकडून ‘ये रे माझ्या मागल्या’ होत आहे.

 

कोल्हापूरात गणेशोत्सवामध्ये आगमन मिरवणूक राजारामपुरीत तर विसर्जन मिरवणूक महाद्वार रोडवर असते. गणेश आगमन मिरवणुकीमध्ये राजारामपुरीत साऊंड सिस्टीम वाजणार काय, किती वाजता बंद होणार, याकडे सर्व मंडळे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासन राजारामपुरी येथे साऊंड सिस्टीम आणि लेसरबाबत काय भूमिका घेतात, याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. अवघ्या सहा वर्षानंतर या निवडणुका होत आहेत. यंदा चार प्रभागांचा एक प्रभाग होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक आहे. गणेशोत्सवामध्ये आपले मार्केटींग करण्यासाठी इच्छुकांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या इच्छुकांनी आपल्या तालमीसाठी पोलिसांवर नेत्यांकडून दबाव टाकण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

पोलीस प्रशासनाने 2023 मध्ये 116 सार्वजनिक मंडळांविरोधात खटले दाखल केले आहेत. 2024-25 मध्ये 150 मंडळांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे. यापैकी 30 जणांविरोधात न्यायालयात खटले दाखल केले आहेत. उर्वरीत मंडळांना नोटीस दिल्या असून, त्यांचेही खटले पाठवण्यात येणार आहेत.
                                                                                                          - अजित टिके, शहर पोलीस उपअधिक्षक

शांतता झोन                   40 ते 50 डेसिबल

रहिवाशी क्षेत्र                      45 ते 55

व्यावसायिक                      55 ते 65

औद्योगिक                         70 ते 75

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article