For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उझ्बेकचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह विजेता

06:14 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
उझ्बेकचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह विजेता
Advertisement

गुकेशला आठवे स्थान, एरिगेसीची घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ विज्क आन झी, नेदरलँड्स

उझ्बेकच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्हने भारताच्या अर्जुन एरिगेसीचा पराभव करून टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले तर भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेशने संयुक्त आठवे स्थान मिळवित भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

Advertisement

शेवटच्या फेरीतील सामन्यात गुकेशने जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरशी बरोबरी साधत एकूण 6.5 गुण नोंदवले. भारतातर्फे त्याचीच कामगिरी सर्वोत्तम ठरली. मात्र त्याची कामगिरी खूपच खालावल्याने त्याची 2750 एलो रेटिंगच्या खाली घसरण झाली. आर. प्रज्ञानंदनेही नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हान फोरीस्टविरुद्धचा आपला शेवटचा डाव अनिर्णीत राखत 5.5 गुण मिळविले. कँडिडेड्स स्पर्धा जवळ असल्याने येथील स्पर्धेतील कामगिरीवरून त्याला बोध घ्यावा लागेल.

एरिगेसीला सर्वाधिक 29 रेटिंग गुण गमवावे लागल्याने तो आता टॉप टेनमधून बाहेर पडला आहे. गुकेश हा एकमेव भारतीय पहिल्या दहांमध्ये असून तो 10 व्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे 2750 पेक्षा जास्त एलो रेटिंग असणारा एकही भारतीय बुद्धिबळपटू नाही. अब्दुसत्तारोव्हने 13 सामन्यांत 9 गुण मिळवित अव्वल स्थानासह जेतेपद पटकावले. त्याचाच देशवासी व वर्ल्ड कप विजेता जावोखिर सिंदारोव्हने 8.5 गुण घेत दुसरे स्थान मिळवित उझ्बेकचे वर्चस्व दाखवून दिले. शेवटच्या फेरीत सिंदारोव्हने झेकच्या एन्ग्युएनचा पराभव केला. फोरीस्ट, केमर, अमेरिकेचा हान्स नीमन यांनी 7.5 गुणांसह संयुक्त तिसरे तर 7 गुणांसह जर्मनीचा मथायस ब्ल्यूबॉम व तुर्कीचा सेन्सेशन ठरलेला 14 वर्षीय यागिझ कान एर्दोगमस त्यांच्या मागे आहेत.

गुकेश, नेदरलँड्सचा अनीश गिरी, स्लोव्हेनियाचा व्लादिमिर फेडोसोव्ह 6.5 गुणांसह संयुक्त आठवे स्थान, त्यानंतर प्रज्ञानंद 5.5, एरिगेसी, अरविंद चिदंबरम 4.5 गुण, तर शेवटच्या पाच फेऱ्या गमविणारा झेक प्रजासत्ताकचा थाइ दाइ व्हान एन्ग्युएन 3 गुण मिळवित शेवटच्या स्थानावर राहिला.

Advertisement
Tags :

.