For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान होण्यापासून मोदींना कोणीच अडवू शकत नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

08:08 PM Dec 25, 2023 IST | Kalyani Amanagi
पंतप्रधान होण्यापासून मोदींना कोणीच अडवू शकत नाही   पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

राज्यात महायुती सरकारला मोठा हादरा बसण्याचा अंदाज सी व्होटरच्या जनमत चाचणीतून व्यक्त केला आहे. यामध्ये राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. भारताचे भावी पंतप्रधान हे मोदीच असतील असा विश्वास वैद्यकिय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

हसन मुश्रीफ म्हणाले, आजपर्यंत निवडणुका संदर्भात अनेक पोल येऊन गेलेले आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्षात काय घडले हे सर्वश्रुत आहे. कुणाचा पोल काहीही असला तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून कोणीही आडवू शकणार नाही. राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही महिन्यात जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनमतांचा कौल महायुतीलाच मिळेल. टिका करणे हे विरोधकांचे काम आहे. मात्र आम्ही काम करत राहू असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

Advertisement

प्रोत्साहनपर अनुदानाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, प्रोत्साहनपर अनुदान वितरणामध्ये पीक कर्ज उचलीबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत. पण या अडचणी दूर करून सर्व शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जाईल. पात्र-अपात्र ठरलेल्या सर्वांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल असे स्पष्ट करून पाटगाव धरणातून अदानी यांच्या प्रकल्पाला पाणी देण्याबाबत तेथील नागरिकांचा विरोध असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान शरद पवार यांनी अदानी यांना वीस-पंचवीस वर्षापूर्वी तरूण उद्योजक म्हणून मदत केली होती. त्यांच्या एका प्रकल्पाची पाहणी करण्यासाठीही आम्हा मंत्र्यांना त्यांनी नेले होते. ते एक चांगले उद्योजक आहेत मात्र नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. शेतकऱ्यांच्या वाटणीचे पाणी प्रकल्पाला जाऊ देणार नाही ही जिह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका राहिल असे मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागांवर राष्ट्रवादीचा दावा नाही

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्या दोन्ही जागा त्यांनाच मिळतील असे चित्र आहे. जागा वाटपाच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापैकी एकाही जागेवर दावा केलेला नाही असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.