For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नोबेल विजेत्या मारिया मचाडोंची व्हेनेझुएलात घरवापसी

06:42 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
नोबेल विजेत्या मारिया मचाडोंची व्हेनेझुएलात घरवापसी
Advertisement

अटकेच्या भीतीने सातवेळा प्रयत्न अपयशी : अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा

Advertisement

वृत्तसंस्था, काराकस

व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो सुमारे 10 महिन्यांनी मायदेशी परतल्या ओत. अटकेचा धोका आणि सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांना देशात परतणे कठीण झाले होते. त्यांनी मायदेशी परतण्यासाठी 7 वेळा प्रयत्न केले होते, मात्र प्रत्येकवेळी त्यांना अपयश आले. अखेर अमेरिका, पनामा आणि कोलंबिया यांच्यातील समन्वयातून त्यांच्या सुरत्रित परतीचा मार्ग मोकळा झाला.

Advertisement

मचाडो यांना 2025 मध्ये नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या डिसेंबर 2025 मध्ये गुप्तपणे नॉर्वेला गेल्या होत्या. त्यानंतर त्या काही काळ अमेरिकेत आणि नंतर पनामामध्ये राहिल्या.

राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार

मचाडो यांना 2024 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाग घेता आला नव्हता. व्हेनेझुएला सरकारने त्यांच्यावर 15 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली हाती. यामुळे त्यांनी एडमंडो गोंझालेज यांना विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता. विरोधकांच्या मते, 2024 च्या निवडणुकीत गोंझालेझ विजयी झाले होते, मात्र सरकारने निकोलस मादुरो यांना विजयी घोषित केले. या निकालावरून देशता राजकीय संघर्ष निर्माण झाला. आता मचाडो यांना पुढील वर्षी जुलैपर्यंत निवडणुका घेतल्या जातील अशी अपेक्षा आहे. त्या स्वत: राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, अंतरिम नेत्या डेल्सी रॉड्रिग्ज यांनी निवडणुका घेण्याचे संकेत दिले असले तरी अद्याप तारीख निश्चित केलेली नाही.

बदलले राजकीय समीकरण

जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेल्सी रॉड्रिग्ज यांना अंतरिम नेतृत्वासाठी पाठिंबा दिला. मचाडो यांचे अमेरिकेतील अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असले तरीही ट्रम्प प्रशासनाने त्यांच्याकडे सत्ता सोपवण्याऐवजी रॉड्रिग्ज यांना पाठिंबा दिला. व्हेनेझुएला सध्या निवडणुकांसाठी तयार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

मचाडो सुरक्षित असतील अशी आशा

मचाडो यांच्या मायदेशी परतण्याबाबत विचारले असता ट्रम्प यांनी त्यांना चांगली महिला असे संबोधिले आणि त्या सुरक्षित असतील अशी आशा क्यक्त केली. व्हेनेझुएलामध्ये अमेरिका चांगले काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. व्हेनेझुएलाचे सरकार आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या चर्चेमुळे मचाडो यांच्या सुरक्षित वापसीचा मार्ग मोकळा झाला. देशातील सर्व राजकीय पक्षांना आपली भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य मिळावे आणि सरकार-विरोधकांमधील संवाद सुरू रहावा, अशी अमेरिकेची भूमिका असल्याचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.