महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नोआ लायल्स जगातील वेगवान अॅथलिट

06:58 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Paris: (L-R) Letsile Tebogo (Botswana), Noah Lyles (USA), Oblique Seville (Jamaica) and Akani Simbane (South Africa) contest in the men’s 100m final at the 2024 Summer Olympics, France, Sunday, Aug. 4, 2024. (PTI Photo/Ravi Choudhary) (PTI08_05_2024_000008B) *** Local Caption ***
Advertisement

9.79 सेकंदात पूर्ण केली 100 मी शर्यत : अवघ्या 0.005 सेकंदाच्या फरकाने बाजी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 100 मीटर स्पर्धेत अमेरिकेच्या नोआ लायल्सने अप्रतिम कामगिरी केली. रविवारी 4 ऑगस्ट रोजी झालेल्या शर्यतीत अमेरिकन धावपटूने जमैकाच्या किशाने थॉम्पसनला अगदी अल्पशा फरकाने पराभूत करुन अव्वलस्थान पटकावले. थॉम्पसनच्या 9.789 सेकंदांपेक्षा केवळ 0.005 जास्त असलेल्या लायल्सने 9.784 सेकंदाच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह सुवर्णपदक जिंकले. अमेरिकेच्या फ्रेड केरलीला कांस्यपदक मिळाले. दरम्यान, लायल्स आता पुरुषांच्या 200 मी शर्यतीतही सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार आहे.

श्वास रोखून धरणाऱ्या या 10 सेकंदाच्या शर्यतीत जगातील अव्वल अॅथलिट्सनी सहभाग नोंदवला. अगदी सेंकदाच्या छोट्या पाँईटपर्यत रंगलेली ही शर्यत ऑलिम्पिक इतिहासातील रोमांचक शर्यत ठरली हे विशेष. पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स येथे 100 मीटर शर्यतीचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा व भारी झाला. अमेरिकन धावपटू लायल्सने 9.784 सेकंदाच्या सर्वोत्तम वेळेसह ही शर्यत पूर्ण केली. विशेष म्हणजे, जमैकन धावपटू किशाने थॉम्पसननेही याच वेळेत शर्यत पूर्ण केली. या दोन धावपटूंमध्ये फक्त 0.005 सेकंदांचा फरक होता, ज्यामुळे हा सामना ऑलिम्पिक इतिहासातील रोमांचकारी ठरला. अमेरिकन धावपटू फ्रेड केरलीने कांस्यपदकाला गवसणी घातली. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता इटलीचा जेकब्स मार्सेल पाचव्या स्थानावर राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या अकाने सिम्बाइन रिओ आणि टोकियो या दोन्ही स्पर्धेत पदकपासून थोडक्यात चुकला होता. पॅरिसमध्ये तो पुन्हा एकदा चौथ्या स्थानी राहिला.

20 वर्षानंतर अमेरिकेला सुवर्ण

या स्पर्धेत 20 वर्षांनंतर अमेरिकेला सुवर्णपदक मिळाले. 2004 मध्ये जस्टिन गॅटलिननंतर 100 मीटरमध्ये युनायटेड स्टेट्ससाठी ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला धावपटू बनून नोआ लायल्सने इतिहास रचला. 27 वर्षीय लायल्सने संथ सुरुवात करूनही शानदार पुनरागमन करत ही कामगिरी केली.

 

ही चुरशीची लढत होती. प्रत्येकजण लढाईसाठी तयार होता आणि मला हे सिद्ध करायचे होते की मी त्या सर्वांमध्ये सर्वोत्तम आहे.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता, नोआ लायल्स

 

पुरुष 100 मीटर अंतिम निकाल

सुवर्ण - नोआ लायल्स (अमेरिका), 9.784 सेकंद

रौप्य - किशाने थॉम्पसन (जमैका), 9.789 सेकंद

कांस्य - फ्रेड केर्ली (अमेरिका), 9.810 सेकंद

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article