कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रात कोणतेच काम अशक्य नाही
उद्योजक नारायण बुधलेः कोल्हापूर रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग असो. ची वार्षिक सभा
कोल्हापूर
कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रात विमान व रणगाडे निर्मितीची क्षमता कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात शक्य करून दाखवले आहे असे प्रतिपादन बुधले अॅन्ड सन्स चे मॅनेजिंग डायरेक्टर नारायण बुधले यांनी केले आहे.
कोल्हापूर रेफ्रिजेरशन अँन्ड एअर कंडिशनिंग असोसिएशनच्या 31 व्या बाषिंक सभेत ते बोलत होते. यावेळी या व्यवसायात योगदान दिलेल्या व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रोहिदास चौगुले, ब्रिजलाल लालवाणी,अनंत सरदेशपांडे,अशोक बुरसे, जयसिंग शिंदे,दीपक कुलकर्णी , अबीद मुजावर यांना शाल ,श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. ,या सभेत सभासदासाठी अपघात विमा तसेच ओळखपत्र देण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, क्रिडा स्पर्धा आदी कार्यक्रमाचा आढावा अध्यक्ष सुरेश पाटील यांनी घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन संजय मळेकर तर सूत्रसंचालन रंगराव ऐकल यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष मुकुंद रणदिवे, विजय निपाणीकर, संदीप जोशी, संतोष वाळके, प्रदीप पुरवण,भिकाजी पवार, राजेंद्र इंगवले व सदस्य उपस्थित होते.