For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्येकडे एकही वाहनाला जाऊ दिले जाणार नाही; योगी प्रशासनाचा निर्णय

05:36 PM Jan 23, 2024 IST | Kalyani Amanagi
अयोध्येकडे एकही वाहनाला जाऊ दिले जाणार नाही  योगी प्रशासनाचा निर्णय
Advertisement

श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी रामभक्तांची अयोध्येत अलोट गर्दी होत आहे. यामुळे सर्व सीमा पुन्हा सील करण्यात आल्या आहेत. अयोध्येकडे कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नाही. तसेच पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमा सील केल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

बांबूच्या काठ्यांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथून केवळ पासधारक, आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका, परीक्षार्थी, शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने यांची तपासणी आणि खातरजमा केल्यानंतरच सोडण्यात येत आहेत. भगवे झेंडे घेऊन येणाऱ्या वाहनांना अयोध्येत प्रवेश दिला जात नाही. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील तडकाफडकी अयोध्येत दाखल झाले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.