For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Phone Pe | इंटरनेटशिवाय UPI पेमेंट! स्मार्टफोनची गरज नाही; आता कीपॅड फोनवरूनही करता येणार UPI व्यवहार

03:07 PM Sep 02, 2026 IST | NEETA POTDAR
phone pe   इंटरनेटशिवाय upi पेमेंट  स्मार्टफोनची गरज नाही  आता कीपॅड फोनवरूनही करता येणार upi व्यवहार
Advertisement

मुंबई -फिनटेक कंपनी फोनपेने सोमवारपासून फीचर फोन वापरकर्त्यांसाठी एक नवीन पेमेंट सेवा सुरू केली आहे. कंपनीने 'फोनपे यूपीआय १२३पे' हे फीचर सुरू केले आहे, ज्यामुळे इंटरनेट कनेक्शनशिवाय यूपीआय व्यवहार करणे शक्य होईल. यामध्ये १२ भाषांमध्ये एआय व्हॉईस असिस्टन्सची मदत देखील मिळेल.यामुळे, फोनपे हे फीचर फोन वापरकर्त्यांसाठी ही डिजिटल पेमेंट सेवा सुरू करणारी देशातील पहिली मोठी थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर बनली आहे.देशातील २० कोटींहून अधिक फीचर फोन वापरकर्त्यांना याचा ने फायदा होईल. कृपया लक्षात घ्या की न हे फीचर सध्या फक्त अधिकृत अॅप भीम यूपीआयमध्ये उपलब्ध आहे.

Advertisement

वापरकर्त्यांना यातून कोणते फायदे मिळतील...

या नवीन सेवेचा उद्देश काय आहे आणि किती लोकांना याचा फायदा होईल?
देशातील ज्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये इंटरनेट किंवा स्मार्टफोननाही, तिथे डिजिटल पेमेंट पोहोचवणे हा या सेवेचा उद्देश आहे. फोनपेच्या या वैशिष्ट्यामुळे, देशातील २० कोटींहून अधिक कीपॅड फोन वापरकर्ते थेट डिजिटल व्यवहारांशी जोडले जाऊ शकतील.

Advertisement

सेवा इंटरनेटशिवाय कशी काम करते?
फोनपे यूपीआय १२३पे हे कंपनीच्या मालकीच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे एसएमएसद्वारे काम करते. पाहायला गेल्यास याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते अत्यंत सुरक्षित आहे आणि केवळ रजी नेटवर्क उपलब्ध असलेल्या दुर्गम ग्रामीण भागातही इंटरनेटशिवाय पैसे हस्तांतरित करते. महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणतेही अॅप डाउनलोड करावे लागणार नाही.

Advertisement
Tags :

.