रस्ता नाही...टोल नाही ! तासवडे टोल नाक्यावर काँग्रेसचा हल्लाबोल
उंब्रज / प्रतिनिधी
पुणे- बेंगलोर महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करा, या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने आज कराड जवळचा तासवडे टोलनाक्यावर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी रस्ते नादुरुस्त असताना टोल घेतला जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी तासवडे टोल नाक्यावरून वाहने दोन तासाहुन अधिक काळ मोफत सोडण्यात आली.
कोल्हापूर, सातारा, सांगलीतून पुण्या-मुंबईकडे जाण्यासाठी महामार्ग नादुरुस्त असल्याने आणि सर्वत्र खड्डे असल्याने दुप्पट वेळ लागत आहे. जिथे तीन तास लागत होते, तिथे आता प्रवासाला साडेपाच ते सहा तास लागत आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेण्यात येऊ नये. अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार विश्वजीत कदम यांनी या आंदोलनावेळी दिला. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने नागरिकांना कोणताही त्रास न होता रस्त्याच्या कडेला उभा राहून सातारा ,सांगली , कोल्हापूर,जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने गर्दी करून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.
यावेळी . महाराष्ट्र राज्य माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या रस्ते धोरणामध्ये अदानी ,अंबानी यांचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप केला. महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यांवरती स्थानिक नागरिकांनी सरळ स्टॉल माफ झाला पाहिजे असा पवित्र राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने घेण्यात आला व जोपर्यंत रस्ता त्वरित नीट केला जात नाही तोपर्यंत कुणीही टोल देऊ नये असे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या नेते विश्वजीत कदम यांनी आव्हान केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण ,आमदार विश्वजीत कदम, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे ,प्रदेश सरचिटणीस अॅड उदयसिंह पाटील, कोंग्रस नेते अजितराव पाटील चिखलीकर, कराड उत्तर युवा नेते निवासराव थोरात , मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे , माजी पंचायत समिती नामदेव पाटील, शहराध्यक्ष सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष कराड दक्षिण उमर सय्यद, कराड नगरपरिषद माजी नगरसेवक श्रीकांत मुळें काँग्रेस युवा नेते अमित जाधव, गीतांजली थोरात , काँग्रेस युवा नेते दिग्विजय पाटील, विद्या थोरवडे, प्रदीप जाधव , प्रदीप जाधव, यांच्या प्रमुख उपस्थिती व हजारो काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.