For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन शिक्षण धोरणासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांची भरती नाही

11:14 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
नवीन शिक्षण धोरणासाठी शिक्षक  कर्मचाऱ्यांची भरती नाही
Advertisement

शिक्षण खात्याने केले स्पष्ट : तिसवाडी तालुक्याची बैठक

Advertisement

पणजी : यावर्षी 2024-25 मध्ये इयत्ता नववीपासून आणि नंतर इतर इयत्तांना लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीसाठी नवीन शिक्षक किंवा कर्मचारी भरती करण्यात येणार नसल्याचे शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे. सध्या असलेल्या शिक्षक, कर्मचारीवर्गाचा वापर कऊनच त्या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. सध्या तालुका स्तरावर सर्व शाळांची व्यवस्थापने, शिक्षक,कर्मचारीवर्गाची एससीईआरटीतर्फे बैठका घेऊन तेथे वरील संदेश देण्याचे काम शिक्षण खात्याने सुरू केले आहे. तिसवाडी तालुक्यातील शाळा व्यवस्थापन, कर्मचारी, शिक्षक यांची बैठक कुजिरा शिक्षण संकुल बांबोळी येथे घेण्यात आली. त्यावेळी हे स्पष्ट करण्यात आले.

शाळांनी तास वाढवावे 

Advertisement

नवीन शिक्षण धोरणाची सविस्तर तपशीलवार माहिती त्या बैठकीतून सादर करण्यात आली. त्या धोरणानुसार नववी इयत्तेसाठी शाळांचे तास वाढवण्याची सूचना करण्यात आली असून त्यासाठी शाळांनी आपल्या सोयीनुसार वेळ ठरवावी असे सूचित करण्यात आले आहे. त्यासाठी शिक्षण खात्याने काही पर्याय दिले असून सोयीस्कर असलेला पर्याय शाळांना निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

शाळा सायंकाळपर्यंत चालतील 

काही शाळांनी नववीसाठी आठवड्यातून दोन ते तीन पूर्ण दिवस देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नवीन शिक्षण धोरणानुसार काही शाळा पूर्ण दिवस चालतील. त्यात दुपारनंतर दोन तास वाढणार असल्याने शाळा सायंकाळी 4.30 वा.पर्यंत चालतील असा अंदाज आहे.

Advertisement
Tags :

.