For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रोचे खासगीकरण नाही!

06:48 AM Sep 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
इस्रोचे खासगीकरण नाही
Advertisement

व्हायरल वृत्तांमुळे संस्थेकडून स्पष्टीकरण

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर

इस्रोचे खासगीकरण करण्याचा किंवा त्याचे महत्त्व आणि भूमिका कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण इस्रोने दिले आहे. इस्रो संस्थेचे खासगीकरण केले जाणार नाही किंवा या संस्थेचे महत्त्व कोणत्याही प्रकारे कमी होऊ दिले जाणार नाही. अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याचा उद्देश देशाच्या पुढील पिढीच्या अंतराळ कार्यक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करणे हा आहे, असे इस्रोने म्हटले आहे, असे स्पष्टीकरणही इस्रोने सोशल मीडियावरील संदेशात दिले आहे.

Advertisement

खासगी उद्योग विकसित झालेल्या तंत्रज्ञान आणि क्षमतांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करून उत्पादन आणि व्यापारीकरणाच्या दिशेने पुढे जातील. यामुळे भारतात एक मजबूत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक अंतराळ परिसंस्था निर्माण होईल, असे इस्रोने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.