For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Konkan News: रत्नागिरी, सिंधुदुर्ग एकही पर्ससीन परवाना नाही, मासेमारी झाल्यास कारवाई होणार

05:44 PM Sep 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
konkan news  रत्नागिरी  सिंधुदुर्ग एकही पर्ससीन परवाना नाही  मासेमारी झाल्यास कारवाई होणार
Advertisement

राज्याच्या १२ सागरी मैल हद्दीच्या आतमध्ये पर्ससीन मासेमारी करता येणार नाही

Advertisement

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या सागरी जलधीक्षेत्रात निश्चित केलेल्या हद्दीत अधिकृत परवानाधारक पर्ससीन नौकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मासेमारी करता येते. परंतु, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने पर्ससीन मासेमारीसाठी कोणतेही परवाने जारी केलेले नाहीत.

त्यामुळे १२ सागरी मैलाच्या आत पर्ससीन मासेमारी केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांनी दिला आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवैध पर्ससीनधारकांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

कुवेसकर म्हणाले, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पर्ससीन मच्छीमारी केवळ १२ सागरी मैलांपलिकडे राष्ट्रीय हद्दीत करता येईल. परंतु राज्याच्या १२ सागरी मैल हद्दीच्या आतमध्ये पर्ससीन मासेमारी करता येणार नाही. कारण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणालाही तसे परवाने देण्यात आलेले नाहीत. तरी पण कुणी नियमबाह्य पर्ससीन मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास गस्ती नौका आणि ड्रोनच्या सहाय्याने प्रभावीपणे कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे कुवेसकर यांनी स्पष्ट केले.

परवानेच नाहीत, मग पर्ससीन मासेमारी कशी होणार?

गेल्या काही वर्षात पर्ससीन मासेमारी सागरी पर्यावरण आणि स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर होणाऱ्या परिणामांमुळे वादग्रस्त ठरली आहे. पर्ससीन तंत्रात मोठ्या जाळ्यांचा वापर करून मासे मोठ्या प्रमाणात पकडले जातात. ज्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे पारंपरिक मासेमारीवर अवलंबून असलेले उत्पन्न धोक्यात येते.

२०१६ साली महाराष्ट्र सरकारने पर्यावरणीय रक्षण आणि स्थानिक मच्छीमारांच्या तक्रारींमुळे पर्ससीन मच्छीमारीवर काही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार अधिकृत परवानाधारक पर्ससीन नौकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राज्य सरकारने ठरवून दिलेली सागरी हद्द व जाळ्यांविषयींच्या नियमांना अधीन राहून पर्ससीन मासेमारी करता येते. परंतु यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला रत्नागिरी व सिंधुदुर्गातील एकाही पर्ससीन नौकेला अधिकृत परवाना दिला गेला नसल्याने रत्नागिरी व सिंधुदुर्गातील पर्ससीन नौकांची १२ सागरी मैलाच्या आतील पर्ससीन मासेमारी

Advertisement
Tags :

.